आरती सद्गुरुनाथा
ओवाळू आरती माझा सद्गुरुनाथा !
पाचाही तत्वांचा, दीप लावीला आता !! ध्रू !!
निर्गुणाची स्थिति कैसी साकारा आली !
सर्वा घटी भरुनि उरली गुरु माउली !! १ !!
रज - तम - सत्व तिघे माया प्रसवली !
माये चिये पोटी , कैसी माया उधभवली !! २ !!
सप्तसागरी कैसा खेळ मांडिला !
खेळोनिया खेळ अवघा विस्तार केला !! ३ !!
ब्रम्हांडीची रचना कैसी दाखवली डोळा !
तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा !! ४ !!
|